धान्याचा काळाबाजार करणाऱ्या गोडाऊनवर पोलिसांचा छापा

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर तालुक्यातील वैजापूर रस्त्यावरील जांबरगाव शिवारात धान्याचा काळाबाजार करणाऱ्या एका गोडाऊन वर वैजापूर पोलिसांनी कारवाई केली.

या कारवाईत १२ ते १५ टन धान्य जप्त करण्यात आले. ४ ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजता ही कारवाई करण्यात आली. जांबरगाव शिवारात अवैधपणे धान्याचा काळाबाजार
केला जातो अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांच्या पथकाने कारवाई केली.

संबंधित कारवाईचे पत्र महसूल विभागास देण्यात आले आहे. महसूल विभागाकडून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
संबंधित गोडाऊन वाजेद सुलतान कुरेशी याचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अनेक वर्षापासून वाजिद कुरेशी वैजापूर शहरासह ग्रामीण भागात धान्य गोळा करून दर हप्त्याला साधारणपणे एक ट्रक धान्य बाहेर पाठवतो. परंतु त्यावर कुठलीही कारवाई होत नाही. पोलीस अधीक्षक यांच्या पथकापर्यंत तक्रारी गेल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. 
तपासणी अहवालाबद्दल शंका
वैजापूर पोलिसांसह महसूल विभागाने जरी धान्य तपासणीसाठी परभणी येथील प्रयोगशाळेत पाठवले असले तरी, त्या अहवालाबद्दल संशयच आहे. कारण दोन महिन्यापूर्वी सुद्धा तांदळाचा ट्रक पकडला होता. त्याबद्दल सुद्धा हा तांदूळ शासकीय नाही, असा अहवाल आला होता. लक्ष्मी दर्शनामुळे असे अनेक अहवाल बदलले जातात.